

भोर, ता. १७ : ‘‘शहरात नागरिकांसाठी मोफत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिकेची निर्मिती करण्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे. भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला आहे,’’ अशी माहिती नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी दिली.
शहरातील एस टी स्टँडजवळील दीक्षाभूमी शेजारील जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिकेच्या इमारतीची उभारणी केली जाणार आहे. मंगळवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रम खुटवड आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.