निवडणूक प्रक्रियेत पोलिस निरीक्षकाचा अडथळा

निवडणूक प्रक्रियेत पोलिस निरीक्षकाचा अडथळा
Published on

भोर, ता. २८ : राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी खडकी (ता. भोर) येथील पोटनिवडणुकीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्यावर मद्यप्राशनाचा संशय घेऊन दमबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेला नाहक त्रास सहन करावा लागला असून, खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदारांना तातडीने दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागली.
खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (ता. २७) सायंकाळी निवडणूक कर्मचारी मतदान यंत्रांसह दाखल झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी एका शिक्षक कर्मचाऱ्याला मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून विचारणा केली. सहकाऱ्यांनी संबंधित शिक्षक व्यसनी नसल्याचे सांगूनही, गवळी यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. अखेर तहसीलदारांनी खात्री केल्यानंतर संबंधित कर्मचारी निर्दोष असल्याचे आढळले, मात्र प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी नवीन कर्मचारी नियुक्त केला.
दरम्यान, कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता गवळी यांनी संबंधित कर्मचाऱ्याला ''मी मद्यप्राशन केले आहे'' असे बोलण्यास भाग पाडून त्याचे व्हिडिओ शूटिंग केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत पोलिस निरीक्षक गवळी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.


खडकी येथील मतदान केंद्रावर एका कर्मचाऱ्याने मद्यप्राशन केल्याचा आरोप पोलिस निरीक्षकांनी केला होता. निवडणूक प्रक्रियेत अडथळा येऊ नये, म्हणून आम्ही तेथे तातडीने दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली.
- राजेंद्र नजन, तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com