टीसी महाविद्यालयात व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीसी महाविद्यालयात व्याख्यान
टीसी महाविद्यालयात व्याख्यान

टीसी महाविद्यालयात व्याख्यान

sakal_logo
By

बारामती, ता. ६ ः ‘‘स्त्रिया जो पर्यंत वंचित आणि दुर्बल राहतील तो पर्यंत विकासाची प्रक्रीया सुरु होऊ शकत नाही, ’’ असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल यांनी केले.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात महिला सबलीकरण समितीतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पटेल यांचे स्त्री सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान झाले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
पटेल म्हणाल्या, ‘‘जगाच्या अर्थपातळीवर पोहोचलेल्या तीन टक्केच महिला आहेत. ज्या वंचित दुर्बल महिला आहेत. त्यांचा कार्यकारण भाव समजून घेतला पाहिजे. स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. स्त्रियांना आग्रहाने निर्णय क्षमतेमध्ये प्राधान्य दिले पाहिजे.’’ उपप्राचार्या डॉ. सीमा नाईक गोसावी अध्यक्षस्थानी होत्या. वैशाली पोळ यांनी परिचय करून दिला, स्मिता मंगुडकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतिभा जावळे यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर व सचिव मिलिंद वाघोलीकर यांनी मार्गदर्शन केले.