बारामतीतील ‘तिरंगा’च्या शिवप्रसाद साबळे याचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीतील ‘तिरंगा’च्या 
शिवप्रसाद साबळे याचे यश
बारामतीतील ‘तिरंगा’च्या शिवप्रसाद साबळे याचे यश

बारामतीतील ‘तिरंगा’च्या शिवप्रसाद साबळे याचे यश

sakal_logo
By

बारामती, ता. ६ ः येथील “तिरंगा कॉलेज ऑफ डिझाईन शिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या शिवप्रसाद साबळे याने वेड या मराठी चित्रपटाकरिता कॉम्प्युटर ग्राफिक्स आर्टिस्ट म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली. मीडिया ग्राफिक्स व ॲनिमेशन या अभ्यासक्रमानंतर शिवप्रसाद याने कॉम्प्युटर ग्राफिक्स आर्टिस्ट म्हणून काम सुरु केले. वेड चित्रपटासाठी त्याने योगदान दिले.
संस्थेचे चेअरमन रणजित शिंदे, सचिव रजनी शिंदे व कॉर्पोरेट डायरेक्टर पोपटराव मोहिते यांनी त्याचे अभिनंदन केले. “तिरंगा कॉलेज ऑफ डिझाईन”मधील शिक्षक किशोर कराळे, अमित चरेगांवकर, विकास आगाव, योगेश सावंत, सर्वेश तगवाले व आरशिन बागवान यांचे शिवप्रसादला मार्गदर्शन लाभले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाशी निगडित असलेल्या मीडिया ग्राफिक्स व ॲनिमेशन प्रकारचे शिक्षण घेऊन या क्षेत्रात त्यांना प्रसिध्दी व उत्तम रोजगार निर्माण व्हावा म्हणून ही संस्था कार्यरत आहे.