तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय ‘स्टेला मेरीस’मध्ये शैक्षणिक करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय 
‘स्टेला मेरीस’मध्ये शैक्षणिक करार
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय ‘स्टेला मेरीस’मध्ये शैक्षणिक करार

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय ‘स्टेला मेरीस’मध्ये शैक्षणिक करार

sakal_logo
By

बारामती, ता. १९ : उच्च शिक्षणातील गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने तमिळनाडूतील चेन्नई येथील स्टेला मेरीस महाविद्यालयासोबत नुकताच शैक्षणिक करार केला.

या करारामुळे संयुक्त संशोधन उपक्रम आणि प्रकाशने, संयुक्त कार्यक्रम, परिसंवाद, परिषद आणि शैक्षणिक बैठकांचे आयोजन, शिक्षक व विद्यार्थ्यांना परस्पर महाविद्यालयांत काम करण्यासह शैक्षणिक माहिती आणि सामग्रीची देवाणघेवाण करण्यात येणार आहे.

या वेळी आधुनिक तंत्रज्ञानसंगत, तंत्रकौशल्यावर आधारित, ज्ञानरचनावाद व नवनिर्मिती मूल्यांवर आधारित उच्च शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी सांगितले. या प्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. चंद्रशेखर मुरुमकर, आयक्यूएसी को-ऑर्डिनेटर डॉ. योगिनी मुळे, स्टेला मेरीस महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जोसेफ रोसी, आयक्यूएसी को-ऑर्डिनेटर डॉ. लक्ष्मी प्रिया तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अविनाश जगताप, रुसा को-ऑर्डिनेटर डॉ. रामचंद्र सपकाळ, परीक्षा मूल्यमापन को-ऑर्डिनेटर डॉ. वैशाली पाटील, डॉ. सचिन गाडेकर आदी उपस्थित होते.