Thur, March 30, 2023

बारामती ईरा स्कूलमध्ये
भूगोल दिन साजरा
बारामती ईरा स्कूलमध्ये भूगोल दिन साजरा
Published on : 7 February 2023, 11:52 am
बारामती, ता. ७ ः बाळासाहेब देवळे फाउंडेशनच्या ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिऑग्राफी दिवस साजरा करण्यात आला.
इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गामध्ये विविध राज्यांच्या संस्कृतीचे सादरीकरण केले. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश या राज्यांची भाषाशैली, संस्कृती, परंपरा, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, पोशाख, खाद्य संस्कृती व त्या-त्या राज्यांचे पारंपारिक नृत्य प्रकार आदींचे सादरीकरण केले.
या उपक्रमामुळे मुलांचा बौद्धिक, भौगोलिक, ऐतिहासिक सामाजिक गुणांचा विकास होण्यास मदत झाली.
या उपक्रमास पालकांचा प्रतिसाद मिळाला. शाळेच्या संचालिका पूजा देवळे व प्राचार्या वीरजा कोरती यांनी या उपक्रमाची संकल्पना आखून प्रत्यक्षात आणली.
-------------------------------------