
बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्यान
बारामती, ता. १८ : येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व डिजिटल डिटॉक्स’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी डॉ. दीपक तांबे यांनी व्यक्तिमत्त्व विकासाबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्त्व विकासासाठी नेमके काय करायला हवे, याबाबत त्यांनी मुलांना टिप्स दिल्या. ॲड. दीपा महाडीक यांनी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा मर्यादित वापर कसा करावा, अतिवापर टाळून त्याचे दुष्परिणाम अभ्यासासह आयुष्यावर होऊ नयेत या साठी काय केले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या उपअधिष्ठाता डॉ. अंजली शेटे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. डॉ. अभिलाषा जाधव व डॉ. विनिता कुमारी यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले. सीमा कोकरे, धनंजय करडे, रोहिणी राऊत, आकाश होळकर, महेश देवकाते आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.