
बारामती मॅरेथॉनमध्ये केनियाच्या जेम्सची बाजी
बारामती, ता. १९ : शरयू फाउंडेशन व बारामती रनर्स यांच्या वतीने आयोजित बारामती मॅरेथॉन स्पर्धेत केनियाच्या जेम्स कोरीर याने प्रथम क्रमांक पटकाविला. २१ कि.मी.च्या मुख्य स्पर्धेत जेम्सने निर्विवाद वर्चस्व राखत प्रथम क्रमांकावर नाव कोरले.
पहाटे सहा वाजता खासदार सुप्रिया सुळे, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, सुधा सिंग यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. केनियाच्या धावपटूंसह दिल्ली, हरियाना, बंगळूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील धावपटूंनी या मॅरेथॉनला हजेरी लावली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. स्वागत व प्रास्ताविक शर्मिला पवार यांनी केले. या प्रसंगी श्रीनिवास पवार, संभाजी होळकर, डॉ. अजिनाथ खरात, अभिनेते अशोक समर्थ, शिवाजी काळे, राजीव देशपांडे, अँड. अमोल वाबळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या शंभर टक्के यशस्वितेबद्दल अजित पवार यांनी संयोजकांची प्रशंसा केली. या निमित्ताने बारामतीत क्रीडामय वातावरण तयार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- (अनुक्रमे प्रथम ते पाचवा या क्रमाने) खुला गट २१ किमी (पुरुष) जेम्स कोरीर (केनिया), प्रवीण कांबळे , सुनील कुमार, सुरजीत रामा राजभर, अनंत गावकर.
महिला - ख्रिस्तीने कांबू मु्यंगा, ब्रिगिड किमतवाय, शिवानी चौरासिया, समीक्षा खरे, नेहा सिंग.
खुला गट १० किमी (पुरुष)- शुभम सिंधू, धीरज यादव, सजल सावंत.
महिला- शाली धर्मा, ऋतुजा कांबळे, गायत्री चौधरी.
२१ कि.मी. वयोगट ३५-५५ (पुरुष) : रविराज कोंडीकीरे, सुनील शिवाने, तानाजी नलवडे, (महिला) रश्मी सातव, अपर्णा प्रभुदेसाई, अलमास मुलाणी.
२१ किमी वयोगट ५५+ पुरुष : पांडुरंग चौगुले, संजय पाटील, केशव मोटे.
(महिला) दुर्गा शील, विन्फ्रेन्ड फोन्सेका, उषा पाटील.
06789