Fri, March 31, 2023

बारामतीत गुटखा जप्त
बारामतीत गुटखा जप्त
Published on : 23 February 2023, 11:21 am
बारामती, ता. २३ : शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर एका वाहनाला ताब्यात घेत गुटखा व दारू जप्त केली.
शहरातील कदम चौकात एका सिल्व्हर रंगाच्या वाहनातून गुटखा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांच्या नेतृत्वाखाली फौजदार युवराज घोडके, हवालदार कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, अक्षय सीताफळ, दशरथ इंगोले, रामचंद्र शिंदे यांच्या पथकाने हे वाहन ताब्यात घेत तपासणी केली. त्यात गुटखा, सुगंधी तंबाखू व टँगो दारूच्या बाटल्या, असा नऊ लाखांचा ऐवज जप्त केला. याच अनुषंगाने गुरुकृपा किराणा स्टोअर्स या दुकानातही गुटखा सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरचा गुटखा आणणारे व विक्री करणारे शंकर ऊर्फ अक्षय राजू धोत्रे व नागेश संतोष दावड यांना अटक केली असून, अतीश राजू धोत्रे हा फरारी झाला.