Mon, March 27, 2023

पोस्टर लावणाऱ्यांचा
शोध घ्यावा : सुळे
पोस्टर लावणाऱ्यांचा शोध घ्यावा : सुळे
Published on : 23 February 2023, 5:11 am
बारामती, ता. २३ : ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर मुंबईत लावणाऱ्याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो असलेले पोस्टर मुंबईत लावण्यात आले. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख पोस्टरवर करण्यात आला आहे. याबाबत बारामतीत दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी या सर्व प्रकारावर कमालीची नाराजी व्यक्त करताना, ‘माझे फोटो विनापरवानगी वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही, एका महिलेचा फोटो पोस्टरवर कसा काय लावला जाऊ शकतोय हा अधिकार कोणालाच नाही,’ या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, हे पोस्टर अथवा त्याचा फोटो मी पाहिलेला नाही, पण हा प्रकारच अयोग्य असल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखवली.