Tue, March 28, 2023

दुर्मिळ रोटा अबलेशन शस्त्रक्रिया गिरीराज हॉस्पिटलमध्ये यशस्वी
दुर्मिळ रोटा अबलेशन शस्त्रक्रिया गिरीराज हॉस्पिटलमध्ये यशस्वी
Published on : 26 February 2023, 8:29 am
बारामती, ता. २६ : येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमेश भोइटे’ यांच्या गिरीराज हॉस्पिटल मध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद शाह हृदयावरील रोटा अबलेशन ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली.
खटाव तालुक्यातील एका रुग्णास अनेक वर्षांपासून छातीत वेदना होत. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन रक्तवाहिन्यात अडथळा असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. अँलर्जीमुळे मोठी शस्त्रक्रिया किंवा अँजिओप्लास्टीही शक्य नव्हती.
डॉ. रमेश भोईटे व डॉ. प्रसाद शाह यांनी बारामतीत प्रथमच रोटा अबलेशन पध्दतीने उपचाराचा निर्णय घेतला. मोठ्या रक्तवाहिनीचे रोटा अबलेशन करून कठीण कॅल्शियम स्तर “हिरेजडीत rotational diamond कटर ” ने कौशल्याने काढून नंतर बलूनिंग व स्टेनटिंग करून तीन ही रक्त वाहिनी मधील रक्त पुरवठा सुरळीत करण्यात आला. संबंधित रुग्णाची प्रकृती आता वेगाने सुधारत आहे.