पाटस ते कण्हेरीचा टप्पा दोन महिन्यात पूर्ण होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटस ते कण्हेरीचा टप्पा 
दोन महिन्यात पूर्ण होणार
पाटस ते कण्हेरीचा टप्पा दोन महिन्यात पूर्ण होणार

पाटस ते कण्हेरीचा टप्पा दोन महिन्यात पूर्ण होणार

sakal_logo
By

बारामती, ता. ११ : संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील पाटस ते बारामतीमार्गे कण्हेरीपर्यंतचा टप्पा येत्या दोन महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे. दरम्यान, बारामती एमआयडीसीनजिक विमानतळाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे पाटस ते उंडवडी ड्रायव्हर ढाबा व पुढे विमानतळापर्यंतच्या कामापर्यंतचा टप्पा पूर्ण झाला आहे. विमानतळाजवळच्या रेल्वे क्रॉसिंगवरच्या उड्डाणपुलाला एअरपोर्ट ॲथोरिटीची परवानगी मिळत नसल्याने हे काम रखडले होते. आता गडकरी यांनी हा अडथळाही दूर झाल्याचे नमूद केले.
पाटसवरून इंदापूरकडे जाताना आता बारामती शहराच्या बाहेरून जाता येईल. त्यामुळे वेळ, अंतर व इंधनात मोठी बचत होणार आहे. विशेष म्हणजे हा टप्पा मुदतीपूर्वी पूर्णत्वास गेला आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत या रस्त्याच्या कामाची मुदत आहे. मात्र, दोन महिन्यातच विमानतळाजवळचा उड्डाणपूल वगळता कण्हेरीपर्यंतचे काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास या प्रकल्पाचे संचालक केशव घोडके यांनी व्यक्त केला आहे.
या रस्त्यावरील सहा उड्डाणपूल व कुरकुंभ, रुई व कण्हेरी येथील व्हीओपी पूर्णत्वास गेलेले आहेत. या रस्त्यामुळे बारामती, दौंड व इंदापूर तालुक्यातील लोकांना मोठा फायदा होणार आहे.