बारामतीतील रुग्णालयांत कोविड तपासणी करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीतील रुग्णालयांत 
कोविड तपासणी करणार
बारामतीतील रुग्णालयांत कोविड तपासणी करणार

बारामतीतील रुग्णालयांत कोविड तपासणी करणार

sakal_logo
By

बारामती, ता. २५ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार बंद केलेली कोविडची तपासणी बारामती तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात डॉक्टरांची चिठ्ठी असेल तर केली जाणार आहे.
कोविडच्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढली असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले. बारामती तालुक्यात नऊ व शहरात चार कोविडचे रुग्ण आहे. अर्थात रुग्णालयात कोणीही उपचार घेत नसून, त्यांना गंभीर स्वरूपाची लक्षणे नसल्याने घरातच विलगीकरणाचा सल्ला दिला आहे. कोविडच्या रुग्णांची संख्या वाढू नये, या साठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी काळजी घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
कोविडच्या रुग्णांचे प्रमाण किंचित वाढले असले, तरी घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही डॉ. खोमणे म्हणाले. राज्य शासनाने फक्त तपासण्या वाढविण्याचे निर्देश दिलेले असून, त्यानुसार आवश्यकतेनुसार तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.