बारामती शहरात विविध उपक्रम

बारामती शहरात विविध उपक्रम

बारामती, ता. २२ ः रमजान ईदनिमित्त बारामतीत मुस्लिम बांधवांच्या वतीने सामूहिक नमाजपठण केले गेले. ईदनिमित्त विविध उपक्रमांचेही बारामतीत आयोजन केले गेले.
येथील ईदगाह मैदानावर सकाळी उबेदुल्लाह काझी यांनी नमाज पठण केले. मुस्लिम बांधवांनी आज रमजान ईद निमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी काझी यांनी मनोगत व्यक्त करताना इस्लाम कँलेंडरप्रमाणे येणारा नववा महिना रमजानचा असतो. याच महिन्यात इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांना अल्लाहकडून पवित्र कुराण प्राप्त झाले. इस्लामची पाच महत्त्वाची कर्तव्ये आहेत. त्यातील दोन म्हणजे रोजा व नमाज हे आहेत. अल्लाहच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणून रमजानच्या महिन्यात रोजा, नमाज, कुराणपठण व जकात (दान) यांना अतिशय महत्त्व असल्याचे सांगितले.
आज शहरातील जामे मशीद, चॉंदशाहवली दर्गा, मक्का मशीद, छगनशाह मशीद, दर्गा मशीद येथेही सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी जकात व फित्र आदी धार्मिक विधी पार पाडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com