बारामतीत विरोधकांचे आव्हान किरकोळीत

बारामतीत विरोधकांचे आव्हान किरकोळीत

बारामती, ता. २९ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने सर्वच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला. यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत पॅनेलने राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, प्रत्यक्षात मात्र भाजपच्या सर्व उमेदवारांना किरकोळ मते मिळाल्याने राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजय झाला.
बारामती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे शनिवारी (ता. २९) मतमोजणीला सकाळी प्रारंभ झाला. त्यानंतर सुरवातीच्या टप्प्यातच या मतदानाचा कल लक्षात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली होती. स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी निवडणुकीत बारकाईने लक्ष घालून व्युव्हरचना केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दणदणीत मात करीत विजय प्राप्त केला.भाजप पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांनी देखील मतदारांकडे गाठीभेटी घेत बदल घडविण्याची विनंती केली होती, मात्र मतदारांनी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलवर विश्वास व्यक्त करीत त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी केले.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत रयत पॅनेलवर मतदारांनी जो विश्वास दाखविला, माझ्या आवाहनाला जो प्रतिसाद दिला, तो विश्वास माझे सर्व नवनिर्वाचित सहकारी सार्थ ठरवून दाखवतील. दोन वगळता सर्वच नवीन चेहरे असल्याने ते जोमाने काम करतील. बाजार समितीचे कामकाज अधिक प्रभावी कसे होईल, याचाच आमचा प्रयत्न असेल.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते

बाजार समितीचे विजयी उमेदवार
कृषी पतसंस्था- सर्वसाधारण- विनायक महादेव गावडे (११७८), सतीश सर्जेराव जगताप (११४१), रामचंद्र श्‍यामराव खलाटे (११५३), बापूराव दौलतराव कोकरे (११६६), दयाराम सदाशिव महाडीक (११४८), सुनील वसंतराव पवार (११३१), दत्तात्रेय शंकरराव तावरे (१११६). महिला- शोभा विलास कदम (१२११), प्रतिभा दिलीप परकाळे (१२३३). भटक्या विमुक्त जाती जमाती- शुभम प्रताप ठोंबरे (१२१०), इतर मागासवर्ग- नीलेश भगवान लडकत (बिनविरोध).
ग्रामपंचायत- सर्वसाधारण- विशाल ज्ञानदेव भोंडवे (४३०), विश्वास तानाजी आटोळे (४२४). आर्थिक दुर्बल- युवराज कैलास देवकाते (४३७). ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती- अरुण गणपत सकट (४५१), व्यापारी व अडते- मिलिंद अशोक सालपे (२२०) व संतोष पांडुरंग आटोळे (२०४), हमाल व तोलारी- नितीन शंकर सरक (१४१).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com