‘शासन आपल्या दारी’चा लाभ घ्यावा ः नावडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शासन आपल्या दारी’चा 
लाभ घ्यावा ः नावडकर
‘शासन आपल्या दारी’चा लाभ घ्यावा ः नावडकर

‘शासन आपल्या दारी’चा लाभ घ्यावा ः नावडकर

sakal_logo
By

बारामती, ता. २७ : बारामती तालुक्यातील ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत शिबिराचे ३० मे रोजी सकाळी ११ वाजता आधिराज मंगल कार्यालय, (महालक्ष्मी शोरुमच्या शेजारी, फलटण रोड, बारामती) येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नावडकर यांनी केले.
या शिबिरात महसूल विभागांतर्गत येणारे उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात/रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे, जीर्ण किंवा खराब शिधापत्रिका बदलणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती, सामाजिक विशेष साहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा, दीर्घकालीन आजार, दिव्यांगांसाठीच्या योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, नवीन मतदार नोंदणी करणे, नवीन आधारकार्ड काढणे किंवा दुरुस्ती करणे, दिव्यांगासाठी आधार कार्ड नोंदणी करणे आदी सेवा देण्यात येणार आहेत.
घरगुती नवीन वीज कनेक्शन, कोविड प्रतिबंधक लसीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी पास, दिव्यांगासाठी विविध लाभ, विवाह नोंदणी प्रमाणपत्र-अर्ज स्वीकृती, पंचायत समितीअंतर्गत विविध विभाग, कृषी, भूमी अभिलेख योजना, महावितरण, महाऊर्जा, आरोग्य, पोस्ट, वन, सामाजिक वनीकरण, राज्य परिवहन महामंडळ, उप प्रादेशिक परिवहन विभाग, बँक, पशुसंवर्धन, नगरविकास, पाटबंधारे विभागाच्या योजना व सेवेचा लाभ देण्यात येणार आहे.