Pune : बारामतीच्या दोन विद्यार्थ्यांची राज्याच्या व्हॉलिबॉल संघात निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हॉलिबॉल
बारामतीच्या दोन विद्यार्थ्यांची राज्याच्या व्हॉलिबॉल संघात निवड

Pune : बारामतीच्या दोन विद्यार्थ्यांची राज्याच्या व्हॉलिबॉल संघात निवड

बारामती - बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलिबॉल संघात निवड झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धेमध्ये सय्यद अर्शानअली कला व खानशेहराज पठाण या दोघांनी नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघात स्थान पटकावले.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना लक्ष्मण मेटकरी व किरण पवार यांचे मार्गदर्शक लाभले. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, विश्वस्त सुनेत्रा पवार, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज, प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य अंकुश खोत आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Pune Newssportsstudent