तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशनच्या 
सहा विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशनच्या सहा विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

Published on

बारामती, ता. ८ ः येथील तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशन अँड व्ही. एफ. एक्स मधील त्ररूतुजा बाबर, दिगंबर वनकांबळे, दर्शन बाबर, जय यादव, अजय वाघे, तेजा सरगर, शिवप्रसाद साबळे या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी नुकतीच प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रणजित शिंदे व सचिव रजनी शिंदे यांनी दिली.
सन २०१७ पासून ही संस्था बारामतीत तंत्रज्ञानाशी निगडित असलेल्या मीडिया ग्राफिक्स, ॲनिमेशन व व्ही. एफ. एक्स. प्रकारचे डिजिटल शिक्षण देत या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रसिध्दी व उत्तम रोजगार निर्माण व्हावा म्हणून कार्यरत आहे. आजवर ४५० हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेतून प्रशिक्षण घेतल्यानंतर विविध नामांकित संस्थात नोकरी प्राप्त झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.