बारामतीकरांचा रोटरी ''फन झोन''ला प्रतिसाद

बारामतीकरांचा रोटरी ''फन झोन''ला प्रतिसाद

Published on

बारामती, ता. १८ : येथील रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्बलच्या वतीने आयोजित रोटरी फन झोनमध्ये रविवारी (ता. १६) बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच युवक व आबालवृध्दांनीही विविध खेळांचा आनंद लुटला.

पहाटेपासूनच या फन झोनमधील खेळांसह झुंबा व इतर नृत्याचा लोकांनी आनंद घेतला. या फन झोनमध्ये सहभागी व्यक्ती व संस्थांचा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

फन झोनमध्ये राहील झारी आणि अन्सार इनामदार- बासरी व सेक्सोफोन सादरीकरण, विनय बनकर- झुंबा व योगा, रितेश देशमुख- आर्चरी, युनुस इनामदार-नृत्य, आकाश कुंभार- मातीकाम, फाल्गुनी देशपांडे, रंजना तांबे, रूपाली तावरे व महेंद्र दीक्षित- रंगकाम, वरद देशपांडे, माहेश्वरी दीक्षित, संग्राम जगताप, पवन देशपांडे यांनी कागदाच्या विविध गोष्टी बनवून दाखविल्या.

दादा आव्हाड यांनी कबड्डी तर निशांत बनकर यांनी मल्लखांब प्रात्यक्षिक सादर केले. डॉ. चंद्रकांत कांबळे व डॉ. आबा कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली टीसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर केले.

एकता शहा- स्केटिंग, दीपक मोरे- कराटे, इस्कॉन- भजन, सलीम बागवान यांनी विनोदाचे सादरीकरण केले.
रोटरी फन झोन यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्ष दर्शना गुजर, सचिव अभिजित बर्गे, सचिन चवरे, मल्लिकार्जुन हिरेमठ, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष आशिष अबड, सचिव यश जाधव यांनी परिश्रम केले. डॉ. अजय दरेकर यांनी आभार मानले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

07793

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.