राज्यासाठी बारामतीतील विकास कामे आदर्श : मुंडे

राज्यासाठी बारामतीतील विकास कामे आदर्श : मुंडे

बारामती, ता. ३१: ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यात सुरू असलेली विविध विकास कामे राज्याच्या दृष्टीने आदर्श म्हणावी लागतील. बारामतीला खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे'', असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त येथील बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित आरोग्य वारीचा सांगता समारंभ रविवारी (ता.३०) धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेही उपस्थित होते. कण्हेरी येथे कृषी विभागामार्फत उभारण्यात आलेली फळरोपवाटिका राज्यातच नव्हे तर देशात सुंदर व आदर्श असल्याचे धनंजय मुंडे यांनी नमूद केले.

कण्हेरी (ता. बारामती) येथील कृषी विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या तालुका फळरोप वाटीकेस भेट देऊन पाहणी केली. अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत असलेले संशोधन व इतर बाबींची माहिती जाणून घेतली. तसेच कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवावे या दृष्टीने ही रोपवाटिका आदर्श असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.
या दौऱ्यात कृषिमंत्री मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, शैक्षणिक संकुल येथेही भेट देऊन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असलेल्या शेतीविषयक संशोधनाची माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांनी कृषी विज्ञान केंद्रासही भेट दिली व तेथील उपक्रमांची माहिती घेतली.
07866

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com