‘नटराज’च्या उपक्रमांमध्ये 
१७९० विद्यार्थ्यांचा सहभाग

‘नटराज’च्या उपक्रमांमध्ये १७९० विद्यार्थ्यांचा सहभाग

Published on

बारामती, ता. १८ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील नटराज नाट्य कला मंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बारामती शाखेच्या वतीने चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात पहिली ते दहावीच्या १७९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.
या स्पर्धांमध्ये पहिली ते दहावीच्या १७९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तीन गटामध्ये आयोजित स्पर्धेसाठी फूल, चेंडू, फुगा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, घनकचरा विलगीकरण असे विषय दिले गेले.
सांस्कृतिक कार्यक्रमात १४ शाळांनी सहभाग घेतला. विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळा, विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर व अँक्टिव्ह किड्स व इरा इंटरनॅशनल स्कूल यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्रदान केले गेले. कवी मोरोपंत शिक्षण संस्था, नगरपरिषद शाळा क्रमांक सात, शारदाबाई पवार विद्यालयास उत्तेजनार्थ पारितोषिक दिले गेले. प्रदीप परकाळे, ॲड. सुनील जगताप यांनी परिक्षण केले.
किरण गुजर, अभिजित जाधव, सुधीर पानसरे, ऋतुराज काळे, शुभम ठोंबरे, राजेंद्र बनकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. संजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अमरेंद्र महाडीक, ॲड. अक्षय महाडीक, हनुमंत घाडगे, प्रशांत काटे, प्रतीक घोडके यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com