बारामतीकरांनो, सावधान!
बारामती, ता. १८ : शहरातील तब्बल १६ सदनिका अवघ्या दोन तासांच्या आत फोडून चोरट्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेसह नागरिकांच्या सुरक्षितेताबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. चार चाकीमध्ये येत कटावणीच्या साहाय्याने विविध अपार्टमेंटमधील बंद सदनिका चोरटे निवडतात व त्यातील जवळपास २२ तोळे सोने व इतर ऐवज लांबवितात, ही घटना पोलिसांनाही विचार करायला लावणारी असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरात दिवसा होणारी लूटमार, रात्रीची घरफोडी या प्रकाराने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. अनेक अपार्टमेंटमध्ये सुरक्षिततेसाठी अधिक उपाययोजना करण्याकडे आजपासून सर्वांनीच पुन्हा एकदा लक्ष देण्यास आजच्या घटनेने प्रारंभ केला आहे.
या उपाय करण्याची गरज
- पोलिसांची प्रभागनिहाय दिवसा व रात्रीची गस्त
- अनोळखी दुचाकी व चारचाकी थांबवून तपासणी व नाकाबंदी
- रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घ्यावी
- अचानक तपासणी मोहीम राबवावी
- नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी थांबवून चौकशी करावी
सीसीटीव्ही प्रकल्प रेंगाळला
बारामतीतील सीसीटीव्ही प्रकल्प रेंगाळला असल्याने त्याचा फटका बारामतीकरांना बसत आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास अनेक गुन्हे रोखण्यास मदत होऊ शकेल.
पथदिव्यांची वेळ वाढवणे गरजेचे
नगरपालिकेला वारंवार विनंती करूनही पथदिवे पहाटे पाचच्या सुमारास बंद केले जातात. रात्र मोठी होऊ लागल्याने पथदिव्यांचा कालावधी वाढविण्याबाबत विनंती करूनही नगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. अंधाराचा गैरफायदा चोरटे उठवतात, ही बाब माहिती असतानाही याबाबत काही केले जात नाही.
नागरिकांचाही सहभाग अपेक्षित
बारामती परिसरात संशयित व्यक्ती दिसल्यास किंवा काही संशयास्पद हालचाली किंवा वाहन दिसल्यास जागरूक नागरिकांना ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिल्यास पोलिसांनाही त्याची मदत होऊ शकते. त्या दृष्टीने नागरिकांनीही पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

