आमच्यात वैचारिक मतभेद, मनभेद नाहीत

आमच्यात वैचारिक मतभेद, मनभेद नाहीत
Published on

बारामती, ता. १८ : ‘‘माझ्यासोबत तुम्हाला आज जे दिसत आहेत, ते कार्यकर्ते नाही; तर माझ्या कुटुंबाचेच सदस्य आहेत. त्यामुळे यात काही राजकारण नाही. आमचे वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत. आमचा वैचारिक लढा सुरुच असेल, मात्र माझ्यासोबत असलेली माणसे ही कौटुंबिक आहेत,’’ असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर प्रथमच सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा दौरा केला. यामध्ये सांत्वन भेटींसह अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्याल व बारामती रेल्वे स्थानक व लगतचा रस्ता याला त्यांनी भेट दिली. या दौऱ्यादरम्यान नटराज नाट्य कला मंडळालाही त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, ‘माझ्यासोबत असलेल्या व्यक्ती हा कौटुंबिक सदस्य म्हणून आलेल्या आहेत, त्याचा राजकारणाशी संबंध लावू नये,’ असे स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे यांचा फुटीनंतरचा बारामतीचा पहिलाच दौरा असल्याने त्यांच्यासमवेत कोण असणार, याबाबत उत्सुकता होती. काही पदाधिकारी यात सहभागी झाले होते. मात्र, सुळे यांचा हा दौरा राजकीय नव्हता, तर सांत्वनभेटीचा त्यात प्रमुख भाग होता, असे स्पष्ट करण्यात आले.
एन. डी. पाटील हे कायम शरद पवार यांच्या विरोधात होते. पाटील हे पवारसाहेबांच्या सख्ख्या बहिणीचे यजमान असूनही त्यांचे कायमच वैचारिक मतभेद राहिले, मात्र त्याचा कौटुंबिक पातळीवर कधीच फरक पडला नाही. कायम त्यांचे नातेसंबंध जिव्हाळ्याचे राहिले. राजकारण आणि कुटुंब हे वेगळे ठेवण्याइतपत पवार कुटुंबीय प्रगल्भ आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘एक सेवक म्हणून कार्यरत’
बारामतीत तुम्ही एकाकी पडल्याचे जाणवत आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, ‘‘बारामती हे माझे माहेर आहे, माझी कर्मभूमी आहे, लोक माझ्या बरोबर आहेत आणि राहतील, माझं इथलं राजकारण समाजकारण आहे. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे नेहमी फक्त लोकसभेचच तिकीट मागितलेले आहे. लोकांची सेवा, शेतकऱ्यांचा सन्मान व राज्याच्या स्वाभिमानासाठी मी राजकारणात आले. मी एक सेवक म्हणून कार्यरत आहे. लोकांनी दिलेल्या संधीबद्दल कायमच ऋणी राहीन.’’

राष्ट्रवादीत विचारात अंतर आलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे काही पवार कुटुंब नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत, वैयक्तिक मतभेद नाहीत. अजितदादांच्या मागे धावपळ आहे, हे मी रोज पाहते आहे, पण ते लवकरच बारामतीलाही येतील.
- सुप्रिया सुळे, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com