बारामतीतील अपघातप्रकरणी 
टीपरचालकावर गुन्हा दाखल

बारामतीतील अपघातप्रकरणी टीपरचालकावर गुन्हा दाखल

बारामती, ता. १३ : शहरातील प्रशासकीय भवनसमोरील रिंग रोडवर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या टिपर व दुचाकीच्या अपघातप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात टिपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात तेजस विजय कासवे याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर त्याची आई राधिका विजय कासवे या गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी पोलिस नाईक अप्पासाहेब करे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन टीपरच्या (क्र. एमएच ४२ बीएफ २९४१) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. कासवे माता-पुत्र हे ॲक्टिव्हा दुचाकीवरून (क्र. एमएच ४२ बीके ९७९५) बारामती हॉस्पिटलकडून आले होते. त्यांना टिपरने जोरदार धडक दिली. त्यात तेजस याचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com