आता बारामतीतच व्हा ‘नीट’साठी सज्ज

आता बारामतीतच व्हा ‘नीट’साठी सज्ज

बारामती, ता. १९ : कमी विद्यार्थ्यांत आयआयटी-जेईई परिक्षेत सर्वोत्तम निकाल देणारी लडकत सायन्स अॅकॅडमी व नीट परिक्षेमध्ये शेकडो विद्यार्थी घडवणारी सक्सेस कोड अॅकॅडमी यांनी एकत्रित येत नीट परीक्षेसाठी तयारी करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टार्गेट एम. बी. बी. एस हा दोन वर्षाचा अकरावी व बारावी सायन्स इंटिग्रेटेड कोर्स सुरु केला आहे.

या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन लडकत सायन्स अॅकॅडमीचे संचालक नामदेव लडकत यांनी केले आहे. माफक शुल्कात अत्याध्युनिक पध्दतीचे नीटसाठीचे शिक्षण मुलांना या कोर्सद्वारे मिळणार आहे.

दोन वर्षात सक्सेस कोड अॅकॅडमीचे २० विद्यार्थी देशभरातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस.चे शिक्षण घेत आहेत. इतर कोठेही न जाता बारामतीतच मुलांनी नीट परीक्षेतून शासकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस प्रवेशासाठी अपेक्षित मार्क्स मिळवणे सहज शक्य असल्याचे सक्सेस कोड अँकेडमीचे संचालक ए. पी. भुजबळ यांनी म्हटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com