तूर, हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

तूर, हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

बारामती, ता. २९ : हंगाम २०२३-२०२४ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तूर व चण्यासाठीची (हरभरा) ऑनलाइन नोंदणी २८ मार्च पासून सुरु झाली आहे. हा खरेदीचा कालावधी २५ जून पर्यंत असणार आहे.

ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची तूर प्रति क्विंटल सात हजार व चणा प्रति क्विंटल ५४४० रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे. सध्या तूर व
हरभऱ्याचा नवीन हंगाम सुरू झाल्याने बाजारामध्ये आवक सुरू झाली आहे.

बारामतीत शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले असून शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर मुदतीत नाव नोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा, असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, उपसभापती नीलेश लडकत व सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.

तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी नीरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक, बारामती येथे प्रथम ऑनलाइन नाव नोंदणी करावी. खरेदी सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार तूर व हरभरा खरेदी केंद्रावर आणण्यासाठी नंबर नुसार एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतमाल बारामती बाजार समितीच्या यांत्रिक चाळणी येथील खरेदी केंद्रावर स्वच्छ व वाळवून आणावा, असे आवाहन बाजार समिती तर्फे करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांची नाव नोंदणी होईल त्याच शेतकऱ्यांचा तूर व हरभरा शेतमाल खरेदी होणार असल्याने नोंदणी बंधनकारक आहे.


अशी करावी नोंदणी...
शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी तूर व हरभरा पिकाची नोंद असलेल्या सध्याचा सातबारा उतारा (पिकपेरा), आधारकार्डची छायांकित प्रत, सुरु असलेले बॅक खात्याच्या अचूक तपशिलासह झेरॉक्स, मोबाईल नंबर अशी कागदपत्रे द्यावीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com