बारामतीत विद्यार्थ्यांकडून  
प्रकल्प, पोस्टरचे सादरीकरण

बारामतीत विद्यार्थ्यांकडून प्रकल्प, पोस्टरचे सादरीकरण

बारामती, ता. ११ ः विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना व इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या वतीने विद्युत अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित केली होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, उपप्राचार्य डॉ. एस. बी. लांडे, निबंधक डॉ. राजवीर शास्त्री, विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख पूजा जयस्वाल, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन झाले.
द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक वाहने, मायक्रोग्रीड, रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, आयओटी, पॉवर सिस्टम आणि स्वीच गिअर्स यांसारख्या विविध संशोधन क्षेत्रातील पोस्टर्स आणि प्रोजेक्ट सिम्युलेशन आणि हार्डवेअर, कृत्रिम सिम्युलेशनच्या स्वरूपात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग अँप्लिकेशन्स आणि हार्डवेअरचे परिणाम या प्रकल्पांचे सादरीकरण केले.
स्पर्धेत १७ विद्यार्थी गटांनी भाग घेतला. विद्यार्थ्यांमधील संशोधनाच्या जिज्ञासेला चालना मिळावी, उद्याचे संशोधक तयार व्हावेत या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयक दीपक येवले व वैशाली देवकाते यांनी परिश्रम घेतले. विकास देशमुख यांनी पोस्टर, प्रकल्प, कल्पना, सादरीकरण आणि अहवालानुसार प्रकल्पांचे मूल्यांकन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com