विद्या प्रतिष्ठानने राखली उज्ज्वल यशाची परंपरा

विद्या प्रतिष्ठानने राखली उज्ज्वल यशाची परंपरा

बारामती, ता. १५ : सीबीएसईच्या नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालात यावर्षीही विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून परंपरा कायम राखली.

विद्या प्रतिष्ठानच्या डॉ. सायरस पूनावाला शाळेचा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल १०० टक्के जाहीर झाला. इयत्ता दहावीमध्ये १३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये, अभिषेक पराडके, अश्विनी चव्हाण व सुहानी जाधव यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. प्राचार्या यशस्विनी निगडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम शाळेचाही इयत्ता दहावी व बारावीचा निकाल १०० टक्के जाहीर झाला. इयत्ता दहावीमध्ये २४ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण तर ३३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. प्राचार्या राधा कोरे यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के जाहीर झाला. यामध्ये ८ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण तर ११ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. प्राचार्या तनुश्री गोरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मीडियम शाळेचाही इयत्ता दहावी व बारावीचा निकाल १०० टक्के जाहीर झाला. इयत्ता दहावीमध्ये २० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. प्राचार्य सचिन पाठक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर इंग्लिश मीडियम शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.८६ टक्के जाहीर झाला. यामध्ये २ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण तर १२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. प्राचार्या ज्योती जगताप यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com