बारामतीत ‘मान्सूनपूर्व तयारी’ विषयावर कार्यशाळा

बारामतीत ‘मान्सूनपूर्व तयारी’ विषयावर कार्यशाळा

बारामती, ता. १६ : जागतिक डेंगी दिनानिमित्त पंचायत समिती आरोग्य विभागातील तंत्रज्ञ, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक यांची ‘मान्सूनपूर्व तयारी’ या विषयावर नुकतीच एक दिवसीय उजळणी कार्यशाळा बारामतीत पार पडली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक सुप्रिया सावरकर, आरोग्य निरीक्षक गणेश जाधव, गणेश घोरपडे, आरोग्य सेवक हिम्मत कौले, संदीप बालगुडे उपस्थित होते.
डॉ. खोमणे म्हणाले, ताप असल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात अथवा डॉक्टरकडून उपचार घ्यावेत. मान्सूनपूर्व काळात डास उत्पत्तीचा पारेषण कालावधी अधिक असतो. आरोग्य कर्मचारी यांनी नियमित सर्वेक्षण करावेत, नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा. खासगी प्रयोगशाळा चालकांनी शासकीय दरानुसार डेंगी तपासणीचे दर आकारावेत.
सावरकर म्हणाल्या की, ताप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यामुळे ताप आल्यावर अंगावर न काढता त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
जाधव यांनी ‘हसत खेळत डेंगीवर पाळत’ या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. घोरपडे यांनी ‘दैनंदिन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण’ विषयी मार्गदर्शन करून या सर्वेक्षणात सातत्य ठेवावे, असे आवाहन केले. आरोग्य सेवक श्याम उपाध्ये यांनी ‘जैविक पद्धतीने डास निर्मूलन व डास प्रतिबंधक वनस्पती’ विषयी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com