जादा परताव्याच्या 
आमिषाने फसवणूक

जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक

बारामती, ता. १६ : जादा परताव्याचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक केल्याच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी विजय वसंत कुंभार, शुभांगी विजय कुंभार व विशाल बाळू भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी वैभव मारुती ननवरे (रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
वरील तिघांनी, ‘शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करा, कमी काळात अधिक परतावा देऊ,’ असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी व त्यांच्या आईने वेळोवेळी दोन लाख रुपये रोख व ऑनलाइन दिले. दर महिन्याला बारा हजार रुपयांचा परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखविले. प्रत्यक्षात पैशांची मागणी केली असता पोलिसात तक्रार दिल्यास एकही रुपया परत मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com