ॲपवर खाते उघडायला सांगून 
पावणेनऊ लाखांची फसवणूक

ॲपवर खाते उघडायला सांगून पावणेनऊ लाखांची फसवणूक

बारामती, ता. ९ : येथील एका व्यक्तीस ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगून पावणेनऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
याबाबत प्रतीक महेश कलवाडिया (वय ३९, रा. सायली हिल, बारामती) यांनी याप्रकरणी फिर्यादी दिली आहे. त्यावरून बारामती शहर पोलिसांनी मेरिलीना, निलम सिंग, ओमकार बुधडा, सुखविंदर (सर्वांचे पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या मोबाईलवरील प्रोव्हॅक्स हे ॲप डाउनलोड करून त्यावर खाते उघडण्यास सांगितले गेले. त्यानंतर त्या अकाउंटवर वेगवेगळ्या रकमा भरण्यास सांगितले गेले. फिर्यादीने मार्च महिन्यापासून ते एप्रिल अखेरपर्यंत या खात्यावर ८ लाख ७५ हजार रुपये जमा केलेले आहेत. मात्र, फिर्यादीस शंका आल्यानंतर त्यांनी ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पैसे काढता येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com