महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर पंजाबी, ओसवाल

महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर पंजाबी, ओसवाल

Published on

बारामती, ता. २ : बारामती व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष जगदीश पंजाबी व सहखजिनदार महेश ओसवाल यांची महाराष्ट्राची अग्रगण्य संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री व अॅग्रिकल्चर (MACCIA) यांच्या पुणे जिल्हा कार्यकारणीच्या स्वीकृत सदस्यपदी एकमताने नियुक्ती केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री व ॲग्रिकल्चर ही महाराष्ट्रात गेल्या ९७ वर्षांपासून कार्यरत असलेली संस्था आहे. प्रसिद्ध उद्योजक दिवंगत वालचंद दोशी (वालचंदनगर इंडस्ट्री) यांनी संस्थेची स्थापना केली आहे.
‘‘चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीमध्ये बारामती व्यापारी महासंघाच्या सदस्यांना स्थान देऊ केल्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. या माध्यमातून बारामतीतील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे आणि विविध योजनांवर काम करण्याची संधी बारामती व्यापारी महासंघाला मिळाली,’’ असे महासंघाचे संस्थापक नरेंद्र गुजराती, अध्यक्ष सुशील कुमार सोमाणी व सचिव स्वप्नील मुथा यांनी सांगितले.
पंजाबी व ओसवाल यांचा ललित गांधी यांनी नुकताच बारामतीतील एका कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी महासंघाचे सोमाणी, मुथा, शैलेश साळुंखे, प्रवीण आहुजा, संजय दुधाळ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.