बारामतीत लाडकी बहीण योजनेची जनजागृती

बारामतीत लाडकी बहीण योजनेची जनजागृती

Published on

बारामती, ता. ४ : अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकारातून जनजागृती योजना हाती घेण्यात आली आहे. शहराध्यक्ष जय पाटील व महिलाध्यक्षा अनिता गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत योजनेबाबत माहिती देण्यात आली.

जय पाटील यांच्या पुढाकारातून योजनेबाबत जनजागृती होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष अविनाश बांदल, युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव, पार्थ गालिंदे, ज्योती जाधव उपस्थित होते. या प्रसंगी पाटील व गायकवाड यांनी महिलांशी संवाद साधला.
यावेळी जय पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत पक्ष पातळीवर सूचना दिल्या आहेत. या योजनेपासून कोणीही पात्र महिला वंचित राहू नये, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दरम्यान, पात्र महिलांनी शारदा प्रांगणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या ठिकाणी योजनेच्या माहितीसाठी महिलांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कागदपत्रे जमा करून ऑनलाइन अर्ज दाखल केले जातील.
या योजनेबाबत मार्गदर्शन मिळण्यासह ऑनलाइन अर्जही दाखल होणार असल्याची माहिती समजल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयात महिलांची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

10455

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.