कोतवाल संघटना आज 
राज्यव्यापी आंदोलन करणार

कोतवाल संघटना आज राज्यव्यापी आंदोलन करणार

Published on

बारामती, ता. २ ः गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता. ३) राज्यभरात कोतवालांकडून आंदोलन केले जाणार आहे. बारामती तालुका कोतवाल संघटना या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून या मागण्या प्रलंबित असून राज्य शासनाने तातडीने यावर कार्यवाही करून मागण्या मान्य कराव्यात, आंदोलनाची वेळ आणू नये, अशी मागणी कोतवाल संघटनेने निवेदनाद्वारे बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे केली आहे.
कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करावी, तलाठी व लिपिक पदावर २५ टक्के जागा द्याव्यात, सेवानिवृत्त कोतवालांना पेन्शन व निवृत्ती वेतन योजना द्यावी, कोतवाल पदाचे नामकरण करून तलाठी सहायक किंवा महसूल सेवक, असे करावे, ३०० दिवसांचे रजा रोखीकरण मिळावे, कोतवाल पदापासून ते शिपाई पदापर्यंतचा चाळीस टक्के कोटा दुप्पट करावा, अटल पेन्शन योजनेबाबत सुधारित अध्यादेश जारी करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.