पालखी सोहळ्यात सायबर जनजागृती

पालखी सोहळ्यात 
सायबर जनजागृती
Published on

बारामती, ता. २ : विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्‍यांबरोबर वारकरी होऊन सायबर सुरक्षित दिंडीच्या माध्यमातून सायबर जनजागृतीचे काम करणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षित दिंडीचे आयोजन केले आहे. संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये वारकऱ्यांमध्ये सायबर जागरूकता करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध उपक्रम राबवणार आहेत. दैनंदिन जीवनात होणाऱ्या वेगवेगळ्या सायबर समस्यांचे निराकरण करण्यासाठी काय करावे? काय करू नये? याबद्दल विद्यार्थी वारकऱ्यांमध्ये सायबर जागृतीचे काम करणार आहेत. या दिंडीसाठी सलमा शेख नियोजन करणार आहेत.
प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ. लालासाहेब काशीद, महेश पवार, गजानन जोशी, किशोर ढाणे, विशाल शिंदे, अनिल काळोखे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर, कांचन खिरे, अक्षय शिंदे हे या उपक्रमाचे समन्वयन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com