शेतकऱ्यांना उत्तम सेवा पुरविणार

शेतकऱ्यांना उत्तम सेवा पुरविणार

Published on

बारामती, ता. ३ : ‘‘बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न या पुढील काळातही केला जाईल,’’ अशी ग्वाही संघाचे अध्यक्ष विक्रम भोसले यांनी दिली.

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा ६१ वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी भोसले बोलत होते. तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, खरेदी-विक्री संघाच्या उपाध्यक्षा सोनाली जायपत्रे यांच्यासह संचालक मंडळ या प्रसंगी उपस्थित होते.
संस्थेची ६१ वर्षांची वाटचाल देदीप्यमान असून, या कालावधीत शेतकऱ्यांना संघाने औषधे, बी बियाणे, रासायनिक खते, मेडिकल दुकानातून औषधे तसेच पेट्रोल व सीएनजी पंपाच्या माध्यमातून सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेची उलाढाल १४० कोटींची असून ग्राहक व शेतकरी यांना सर्वोत्तम सुविधा पुरविण्याचे काम केले जात असल्याचे भोसले यांनी नमूद केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था वेगवान वाटचाल करत असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

यावेळी उदयसिंह धुमाळ, रमेश देवकाते, नितीन देवकाते, बाबूराव चव्हाण, संभाजीराव जगताप, ज्ञानदेव नाळे, दत्तात्रेय आवाळे, भारत ढवाण, बाळासाहेब मोरे, अशोक जगताप, अँड. रवींद्र माने, शिवाजी टेंगले, व्यवस्थापक नीलेश लोणकर हे मान्यवर उपस्थित होते.


10469

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.