बारामतीत हृदयरोग तपासणी शिबिरास सुरुवात

बारामतीत हृदयरोग तपासणी शिबिरास सुरुवात

Published on

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील निरामय मेडीकल फाउंडेशनच्या देशपांडे हॉस्पिटलच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. डॉ. अशोक देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया या शिबिरात केल्या जाणार आहेत.
छातीत असह्य वेदना होणे, जडपणा, धडधड व अस्वस्थता वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अतिघाम येणे, अनुवंशिक हृदयरोग, मधुमेह व उच्च रक्तदाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी आपली तपासणी करुन घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
तपासणी शिबिरास सुरुवात झाली असून हे शिबिर येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये अवघ्या चार हजार रुपयात अँजिओग्राफी करुन दिली जाणार असून रुग्णांनी तपासणीसाठी येताना पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, आधारकार्ड, पूर्वी केलेल्या तपासणींचे रिपोर्ट सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. अशोकनगर येथील देशपांडे हॉस्पिटल येथे तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी ९२२५५८१५०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रुग्णांना केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.