सुरक्षित समाजनिर्मितीसाठी मानसिक आरोग्य संतुलित हवे : लोणकर
बारामती, ता. २७ : ‘‘महाविद्यालयीन युवकांचे मानसिक आरोग्य संतुलित असणे, सुरक्षित समाज निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,’’ असे प्रतिपादन समुपदेशक प्रशांत लोणकर यांनी केले. येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ व महाविद्यालयीन रॅगिंग प्रतिबंध समिती यांच्यावतीने रॅगिंग प्रतिबंध सप्ताहानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी ‘महाविद्यालयीन युवकांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर समुपदेशक लोणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
लोणकर म्हणाले, ‘‘मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांच्या बदलत्या जीवनशैलीनुसार, समाजमाध्यमाच्या अतिवापरामुळे त्यांना मानसिक तणावास सामोरे जावे लागते. अशा स्थितीत भावनिक अस्थिरतेवर मात करण्याची गरज असते, यामध्ये प्राध्यापकांसह मित्रमैत्रिणी व पालकांचे योगदान महत्त्वाचे ठरते. छंद जोपासणे, वाचन, मनन व चिंतन करणे, खेळ खेळणे, सहलीतून मन प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करणे, ताण कमी करण्यास याचा फायदा होतो.
प्रास्ताविक डॉ. अमर भोसले यांनी केले, समन्वयक सविता निकळे-साबळे यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

