दांडीया बंद पाडल्याने बारामतीत गुन्हा दाखल
बारामती, ता. ५ : शहरातील ‘चिराग गार्डन’ येथे नवरात्रानिमित्त आयोजित दांडीयाचा कार्यक्रम दंगा करून बंद पाडण्याचा प्रयत्न करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय शांताराम देवकाते (रा. नीरावागज, ता. बारामती), ओंकार विकास खोत (रा सिद्धेश्वर मंदिराशेजारी, बारामती), अजय दिगंबर नलवडे, अजित सुभाष यादव (दोघेही रा. बारामती), अक्षय मोरे व ॲड. किशोर पवार (पूर्ण नाव नाही) यांच्याविरूद्ध या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी महेश हरिश्चंद्र माने यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. ४) चिराग गार्डन येथील दांडियाच्या कार्यक्रमादरम्यान वरील सहा जणांनी कार्यक्रमामध्ये दंगा करून तो बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

