

बारामती विधानसभा मतदारसंघ
अशी झाली लढत : २०१९
विजयी उमेदवार : पक्ष : मिळालेली मते (मताधिक्य)
अजित पवार : राष्ट्रवादी कॉंग्रेस : १९५६४१ (१६५२६५ राज्यातील सर्वाधिक)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला. पक्षातील फुटीनंतर बारामती कोणत्या पवारांची हे सिद्ध करणारी विधानसभा निवडणूक. दोन्ही पक्षांकडून मतदारांना भावनिक आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच महायुतीचे उमेदवार असतील. अजित पवारांना कुटुंबातूनच आव्हान मिळण्याची शक्यता. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अद्यापि उमेदवारीबाबत कोणतीही घोषणा नाही. पवार कुटुंबातील सदस्य कुणाच्या बाजूने उभे राहणार याचीही उत्सुकता.
अशी आहे स्थिती
१. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत होण्याची दाट शक्यता
२. यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार हे अजित पवारांसमोर आव्हान उभे करणार.
३. काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता
४. अजित पवार यांना प्रथमच घरातूनच आव्हान मिळणार
५. अजित पवार यांना बारामतीत अडकवून ठेवण्याचा प्रयत्न होणार
६. लोकसभा निवडणूक निकालाची पार्श्वभूमी असल्याने लक्षवेधी लढत ठरण्याची शक्यता
७. ऐनवेळेस शरद पवार धक्कातंत्र वापरत नवीन उमेदवार देणार का, याचीही जोरदार चर्चा.
८. बारामतीच्या विकासावरच अजित पवार मते मागणार
९. परिवर्तनाची हाक देण्यासाठी युगेंद्र पवार प्रचार करण्याची शक्यता
निवडणूक मुद्दे
बारामती तालुक्यातील पाण्याचा प्रश्न पुन्हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो. बारामतीतील वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, वाढता भ्रष्टाचार या मुद्यावर युगेंद्र पवार यांच्याकडून प्रचार होईल, तर बारामतीचा गेल्या पाच वर्षांत झालेला विकास या मुद्यावर अजित पवार यांच्याकडून प्रचार होईल. साडेआठ हजार कोटींचा निधी बारामतीला दिल्याचा मुद्दा प्रामुख्याने निवडणुकीत उचलला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.