बारामतीच्या सांगता सभांवर
अवघ्या राज्याचे लागले लक्ष

बारामतीच्या सांगता सभांवर अवघ्या राज्याचे लागले लक्ष

Published on

बारामती, ता. १७ : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभा नेहमीच्या प्रथेप्रमाणे ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत घेणार आहेत. यंदा परस्परांच्या विरोधात मतदारांना ते मतदानाचे आवाहन करणार असल्याने बारामतीकर शरद पवार यांच्या हाकेला ओ देतात की अजित पवार यांनाच पुन्हा संधी देतात, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
युगेंद्र पवार यांच्यासाठी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार बारामतीकरांना नेमका काय संदेश देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. अजित पवार यांच्यासमवेत गेलेल्या दिलीप वळसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात ‘गद्दारांना पाडा’ असा थेट संदेश त्यांनी दिला. त्यामुळे बारामतीत अजित पवार यांच्याबाबत ते नेमका काय संदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दुसरीकडे अजित पवार हे स्वतःच बारामतीत उमेदवार आहेत. पक्षफुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने ते बारामतीकरांना काय आवाहन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शरद पवार यांच्यापासून फारकत घेत विधानसभा निवडणूक लढविण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ते मतदारांना कोणते आवाहन करतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, युगेंद्र पवार परिवर्तन घडवतील, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत; तर अजित पवार एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.

एकाच वेळेस दोन्ही सभा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा सोमवारी (ता. 18) दुपारी दोन वाजता बारामतीतील लेंडीपट्टा जुना मोरगाव रस्त्यावरील मैदानात; तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सभा त्याच दिवशी त्याच वेळेस मिशन हायस्कूल ग्राउंडच्या मैदानावर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com