

बारामती, ता. ११ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवारी (ता. १२) राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महावितरणकडून बारामती मंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित (पीडी) असलेल्या थकबाकीदारांची ६७३५ तर वीजचोरीची १९३ प्रकरणे तडजोडीसाठी दाखल केलेली आहेत.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांसाठी ‘महावितरण अभय योजना’ सुरु आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या लघु व उच्चदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी (कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून) ही योजना आहे. बारामती मंडलातील लघुदाब प्रकारातील ६६४९ व उच्चदाबाची ८६ अशी ६७३५ वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी दाखल केली आहेत.
अभय योजनेनुसार एकूण थकीत रकमेतील व्याज आणि विलंब आकाराची संपूर्ण १०० टक्के रक्कम माफ होणार आहे व केवळ मूळ थकबाकीचाच भरणा करावा लागणार आहे.
अभय योजनेनुसार मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सवलत मिळणार आहे. सोबतच मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. यासह मागणीनुसार नवीन वीजजोडणीचा पर्याय उपलब्ध आहे.
तसेच महावितरणच्या बारामती मंडल अंतर्गत भारतीय वीज कायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ अन्वये दाखल केलेली १९३ प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे वीजचोरीच्या प्रकरणात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले नाही अशाही प्रकरणात संबंधित ग्राहक वीजचोरी (दाखलपूर्व) प्रकरणात लोकअदालतीमध्ये तडजोड करू शकतात.
वीजचोरी प्रकरणात तडजोड करून फौजदारी प्रकरणे निकाली काढण्याची या लोकअदालतीद्वारे संधी घ्यावी असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे व अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.