

बारामती, ता. १७ : बारामती क्रेडाईच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय बोराडे, उपाध्यक्षपदी सचिवपदी भगवान चौधर, उपाध्यक्षपदी राजेंद्र खराडे व खजिनदार म्हणून हरिभाऊ काळे यांची एकमताने निवड करण्यात आली. बारामती क्रेडाईची सर्वसाधारण सभा क्रेडाई महाराष्ट्राचे नवनियुक्त अध्यक्ष प्रफुल तावरे व खजिनदार सुरेंद्र भोईटे यांच्या उपस्थितीत पार पडली. यात सन २०२५ ते २०२७ची कार्यकारिणी जाहीर झाली. यामध्ये सहसचिवपदी विजयकुमार चौंडकर यांची नियुक्ती झाली. सिद्धार्थ जाचक यांचे नाव २०२७-२०२९ या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून जाहीर झाले. प्रफुल्ल तावरे, सुरेंद्र भोईटे यांची महाराष्ट्र क्रेडाईच्या अध्यक्ष व खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल, तसेच उद्धव गावडे यांना २०२४चा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे व शिर्के उद्योग समूह यांचे तर्फे दिला जाणारा वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष राहुल खाटमोडे, सचिव अमोल कावळे, सहसचिव जावेद सय्यद, उपाध्यक्ष सिद्धार्थ जाचक, चंद्रकांत शिंगाडे, दीपक काटे, राजेंद्र इंगोले, उद्धव गावडे, गणपत तावरे, विनोद बनकर, संजय चौधर, प्रवीण माने, किरण पानसरे, जगदीश जगताप, पराग गुजर, रोहित घनवट, सुधीर शिंदे, अजित उलगडे, हेमंत भोंग, अविनाश सातव, अक्षय देवकाते, अमित देशमाने, हर्षवर्धन शिंदे, आशिष खत्री, संदीप धवलशंख, संतोष मेरगळ यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.
12111, 12112, 12113
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.