बारामतीतील महाविद्यालयात जनआरोग्य योजना कार्यान्वित

बारामतीतील महाविद्यालयात
जनआरोग्य योजना कार्यान्वित
Published on

बारामती, ता. १२ : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित केली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल शिंदे यांनी या बाबतचा आदेश जारी केला आहे.
यात नमूद केले आहे की, बुधवारपासून (ता. १२) गरीब रुग्णांना मोफत उपचार घेण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शेजारी महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य (MJPJAY) योजनेचे कार्यालय सुरी केले आहे.
योजनेचे नोडल अधिकारी म्हणून डॉ. राहुल गस्तुद तसेच, या योजनेचे एमसीओ म्हणून डॉ. योगेश जेधे आणि एम.सी.सी.ओ म्हणून बालाजी चांडोळकर (८२०८३६८२४८) व माधवी कवडे (७६६६५८८९७६) यांची वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक यांची नियुक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com