बारामतीत आजपासून शिवजन्मोत्सव सोहळा
बारामती, ता. १२ : शहरातील छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध कार्यक्रम आयोजित केला आहे.
यानिमित्त गुरुवारी (ता. १३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग हे शिवचरित्र नृत्यमहोत्सव बीबीडीसी नटराज नाट्यकला मंदिर येथे संध्याकाळी सात वाजता सादर करणार आहेत. शुक्रवारी (ता. १४) शिव गीतांचा कार्यक्रम होणार असून, यात अवधुतजी गांधी चित्रपटातील शिवगीते सादर करणार आहेत. महाराष्ट्राचा मराठी बाणा शिवबा छत्रपती झालं ग फेम शाहीर चंद्रकांत माने यांचा पोवाडा व स्फूर्ती गीते शनिवारी (ता. १५) सादर करणार आहेत. तसेच, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व शिवचरित्रांवर आधारित पुस्तक प्रदर्शन व माफक दरात विक्री १६ मार्चपर्यंत सुरू असेल. सोमवारी (ता. १७) सकाळी पारंपारिक पद्धतीने शिवछत्रपतींचा भव्य पालखी सोहळा होणार आहे. कसबा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथून सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. यावेळी स्वराज्याचे गुप्तहेर, स्वराज्याचे मावळे रणमर्द शिलेदार, ढोल पथक, वारकरी पथक, हलगी पथक, गजीनृत्य पथक, झांज पथक यांचा प्रमुख सहभाग असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

