बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी

बलात्काराचा खोटा गुन्हा 
दाखल करण्याची धमकी
Published on

बारामती, ता. १८ : बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बारामतीतील एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाने या संदर्भात बारामती शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांची व संबंधित महिलेची एका जिममध्ये ओळख झाली. कालांतराने ते पुणे, उज्जैन, तिरुपती, महाबळेश्वर येथे फिरायला गेले होते. दोघांमध्ये झालेल्या संबंधाचे फोटो संबंधित महिलेने काढून ठेवलेले होते. संबंधित व्यावसायिकाने कालांतराने या ब्लँकमेलिंगला कंटाळून पैसे देणे बंद केले. त्यानंतर त्या महिलेने बलात्काराच्या गुन्ह्याच्या धमक्या देण्यास प्रारंभ केला. संबंधित व्यावसायिकाने याला कंटाळून आत्महत्येचाही प्रयत्न केला. मात्र फिर्यादीच्या पत्नीनेच या प्रकरणी पतीला धीर देऊन विश्वास दिल्यानंतर फिर्यादीने संबंधित महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला.
संबंधित महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन लाख ८१ हजारांची रोख रक्कम व १ लाख ६८ हजारांचे हिऱ्याचे मंगळसूत्र, असा ऐवज खंडणी स्वरूपात स्वीकारला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com