वाहनांच्या ‘एचएसआरपी’साठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

वाहनांच्या ‘एचएसआरपी’साठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

Published on

बारामती, ता. २५ : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याकरिता ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.
वाहनांवर एचएसआरपी बसविण्याकरिता यापूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश दिले होते. परंतु जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे काम अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे ही मुदतवाढ दिली आहे.
एका ठिकाणी किमान २५ किंवा २५ पेक्षा अधिक दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक मालकांनी एचएसआरपी बसविण्याकरिता अर्ज केल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंवा गृहनिर्माण संस्थांमध्ये संबंधित एजन्सीमार्फत कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता एचएसआरपी बसविण्यात येईल. या बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रातील वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता M/s FTA HSRP Solutions Pvt Ltd या उत्पादकाची निवड केली आहे. वाहनचालकांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसविण्याकरिता ऑनलाइन अपॉइंटमेंटसाठी https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या संकेतस्थळाला भेट द्यावी. मोटारसायकल व ट्रॅक्टरकरिता ४५० रुपये, तीनचाकी वाहनांकरिता ५०० रुपये आणि सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांकरिता ७४५ रुपये तसेच, वस्तू व सेवा कर आकारला जात आहे. हे शुल्क ऑनलाइन स्वरूपातच भरावे लागणार आहे, असे निकम यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com