विलास करे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

विलास करे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
Published on

बारामती, ता. ४ : येथील निवासी नायब तहसीलदार विलास करे सोमवारी (ता. ३१ मार्च) ३५ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करे यांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देत सन्मान करण्यात आला. बारामतीच्या प्रशासकीय कार्यालयात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तत्कालीन उपविभागीय अधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते त्यांनी उत्कृष्ट कामाबद्दल प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. सातबारा संगणकीकरणाच्या कामाबद्दल सौरभ राव यांच्या हस्ते, दौंड येथे कार्यरत असताना शेती महामंडळाच्या जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना परत देण्याच्या कामाबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला.
नायब तहसीलदार म्हणून त्यांनी दौंड, बारामती, माढा, दहिवडी तालुक्याच्या प्रभारी तहसीलदारपदी काम केले. पारधी समाज, जोशी समाज, अंध, दिव्यांग, तृतीयपंथी यांना जातीचे दाखले, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, तसेच शासन योजनेचे काम देण्याचे विशेष कार्य त्यांच्या हातून झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com