

बारामती, ता. ११ : शहरातील शिवाजी चौकात डोर्लेवाडीकडे वळत असताना टिपरचा धक्का लागून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. राणी रामा शिंदे (वय ३२, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) यांचा या अपघातात मृत्यू झाला.
रामा शिंदे व त्यांची पत्नी राणी शिंदे हे बुधवारी (ता. ९) शिवाजी चौकाकडून डोर्लेवाडीकडे दुचाकीवरून निघाले होते. पाठीमागून आलेल्या टिपरची (क्र. एमएच ४२ एएक्स २४७२) धडक बसल्याने खाली पडलेल्या राणी शिंदे यांना जबर मार लागला. त्यानंतर त्यांना खासगी दवाखान्यात व तेथून सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी टिपरचालक नितीन शिवाजी राठोड (वय २५, रा. सध्या रुई, ता. बारामती मूळ रा. धनगरवाडी, ता. तुळजापूर) याच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.