

बारामती, ता. १८ : नगरपालिका हद्दीमध्ये विनापरवाना बॅनर, पोस्टर, फ्लेक्स लावणाऱ्यांविरुद्ध या पुढील काळात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बारामती नगरपालिकेने दिला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी नागरिकांसाठी एक आवाहन केले आहे. त्यामध्ये त्यांनी हा इशारा दिला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा गंभीर इशारा नगरपालिकेने दिला. त्यामुळे या पुढील काळात नगरपालिका हद्दीमध्ये बेकायदा फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
या जाहीर आवाहनामध्ये पंकज भुसे म्हणतात, बारामती नगर परिषद हद्दीमध्ये विद्युत खांब, झाडे इलेक्ट्रिक डीपी, रस्त्यालगतच्या भिंती, शासकीय व खासगी इमारती यांवर बॅनर, पोस्टर, लीफलेट, जाहिरात बोर्ड, मोठे फ्लेक्स विनापरवानगी लावल्याचे आढळून येत आहे. सदरचे कृत्य हे नियमांचे उल्लंघन करणारे आहे.’’
याबाबत नगरपरिषदेमार्फत गंभीर दखल घेण्यात आलेली असून, नगरपरिषदेमार्फत महाराष्ट्र सार्वजनिक विद्रूपीकरण कायदा, १९५५ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ याद्वारे संबंधित अनधिकृत बॅनर, पोस्टर, लीफलेट, जाहिरात बोर्ड, मोठे फ्लेक्स लावणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.